Learn More
about DhiYogi Foundation (501 c3).
Grants Given | Workshops conducted | Books + KB | Yoga + Brainstorms | About
You may request annual filings/information or provide input below
about DhiYogi Foundation (501 c3).
Grants Given | Workshops conducted | Books + KB | Yoga + Brainstorms | About
You may request annual filings/information or provide input below
A message from Appa Mama , translated for the kids: On Anna’s memorial day today, countless memories of him are flooding my mind… Once, I had spoken about buying a bicycle, and Anna quietly said, “You have slippers on your feet, don’t you? Then look at those who walk barefoot. Learn to be content with what you have.” He would always teach something or the other through every incident in life. Whenever I told him about a new plan, he would smile and say, “The more responsibilities you take on, the more worries you have. Earn a little for yourself, but live more and more for others.” At that time, I had not fully understood the meaning of those words; but today, at this age, I deeply realize the wisdom and philosophy of life behind each of his statements. He would always say, “Avoid unnecessary eating, keep your tongue under control. Take care of your health. When you lie down at night, you should be able to sleep peacefully.” Such simple words… yet they contained the complete mantra for living a happy and healthy life. Behind my back, he would proudly tell my friends, “Wherever Mahavir kicks, he will bring… Read more »
आज अण्णांच्या स्मृतिदिनी त्यांच्या असंख्य आठवणी मनात दाटून येत आहेत…
मी एकदा सायकल घेण्याबद्दल बोललो होतो, तेव्हा अण्णा शांतपणे म्हणाले होते, “पायात चप्पल आहेत ना? मग अनवाणी चालणाऱ्यांकडे पाहा. जे आहे त्यात समाधान मानायला शीक.”
जीवनातील प्रत्येक प्रसंगातून ते काही ना काही शिकवण देत असत. मी एखादी नवी योजना सांगितली की हसत म्हणायचे, “जेवढा व्याप, तेवढा संताप. थोडं स्वतःसाठी कमवा, पण अधिकाधिक दुसऱ्यांसाठी जगा.” त्या वेळी त्या शब्दांचा अर्थ पूर्णपणे उमगला नव्हता; पण आज या वयात त्यांच्या प्रत्येक वाक्यामागचे शहाणपण आणि जीवनाचे तत्त्वज्ञान प्रकर्षाने जाणवते.
ते नेहमी सांगायचे, “अनावश्यक खाणे टाळा, तोंडावर संयम ठेवा. तब्येत जपा. रात्री निजल्यावर शांत झोप लागली पाहिजे.” किती साधे शब्द… पण आयुष्य सुखी आणि निरोगी जगण्याचा संपूर्ण मंत्र त्यात दडलेला होता.
माझ्या पाठीमागे मित्रांना अभिमानाने म्हणायचे, “महावीर जिथे लाथ मारील, तिथे पाणी काढील!” त्यांचा माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ होते.
असे कितीतरी मोलाचे उपदेश, संस्कार आणि जीवनमूल्ये अण्णांनी मला दिली. आज त्यांच्या प्रत्येक शब्दाची किंमत अधिकाधिक जाणवते. ते आज आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आणि त्यांचे प्रेम कायम माझ्यासोबत आहे.
आज त्यांच्या पवित्र स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम.